image_650_365

चाबहार बंदरमार्गे भारताचं गव्हाचं जहाज अफगाणिस्तानकडे रवाना

देश

image_650_365

पाकिस्तानला दणका देत भारताचं गव्हाचं जहाज इराणधील चाबहार बंदरामार्गे अफगाणिस्तानकडे रवाना झालं आहे. व्यापारासाठी भारताने पहिल्यांदाच इराणमधील चाबहार बंदराचा वापर केला आहे.
इराणमधील ज्या चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे, त्याच बंदरामुळे आता इराणसह अफगाणिस्तान हे तिन्ही देश एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत.
भारत आणि अफगाणिस्तानमध्ये झालेल्या करारानुसार भारत ११ लाख टन गहू अफगाणिस्तानला पुरवणार आहे. तो गहू घेऊन भारताचं जहार चाबहार बंदरामार्गे रविवारी अखेर रवाना झालं.
मात्र आता इराणमधील चाबहार बंदरमार्गे गहू अफगाणिस्तानात पाठवण्यात येणार आहे. यापुढे भारताला पाकिस्तानला वळसा घालून अफगाणिस्तान आणि इराणशी संपर्क साधणे सहज शक्य होणार आहे.‘पुढील काही महिन्यांमध्ये भारत अफगाणिस्तानमध्ये लाखो टन गहू निर्यात करणार आहे.
भारतासाठी चाबहार बंदर महत्त्वाचा आहे. या बंदराच्या विकासासाठी आणि इतर पायाभूत सुविधांसाठी भारताने इराणला ५० कोटी डॉलरची मदत केली होती. चाबहारला रस्ता व रेल्वेमार्गे अफगाणिस्तानला जोडण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पात अफगाणिस्तानही भारताचा भागीदार असणार आहे. त्यामुळे भारत- इराण – अफगाणिस्तान या तिन्ही देशांसाठी हे बंदर अत्यंत महत्त्वाचे आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *