prv_1507887993

आयसीसीची कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगला मान्यता

क्रीडा

prv_1507887993

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषकात ज्या प्रमाणे सर्व संघ एकत्र खेळतात, त्याच प्रमाणे आता कसोटी क्रिकेटमध्येही सर्व संघ एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. आयसीसीने कसोटी चॅम्पियनशिप आणि वन डे लीगसाठी मान्यता दिली आहे. २०१९ च्या विश्वचषकानंतर या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत ९ संघ सहभागी होतील. स्पर्धेचा कालावधी दोन वर्षांचा असून त्यामध्ये सहा मालिकांचा समावेश असेल. ऑकलंडमध्ये झालेल्या आयसीसीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.कसोटी क्रिकेट क्रमवारीतले पहिले ९ संघ सहा कसोटी मालिका खेळतील. यातील ३ मालिका या घरच्या मैदानावर तर ३ मालिका या प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर खेळवल्या जातील. यात प्रत्येक संघाला दोन कसोटी सामने खेळणं आवश्यक असून गरजेनूसार मालिकेत या सामन्यांची संख्या पाचपर्यंत वाढवता येऊ शकते.
२०२३ च्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला दर दोन वर्षांनी वन डे लीग खेळवण्यात येईल. त्यानंतर दर तीन वर्षांनी लीग खेळवण्यात येईल. या लीगमध्ये प्रत्येक संघाला ८ मालिका खेळाव्या लागतील. यापैकी चार घरच्या मैदानावर, तर उर्वरित चार प्रतिस्पर्धी देशात होतील. एका मालिकेत जास्तीत जास्त तीन वन डे सामने खेळवण्याची अट असेल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *