pesticides-poisoning

कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

महाराष्ट्र

pesticides-poisoning

कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने कीटकनाशक तयार करणाऱ्या कंपन्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यवतमाळमधील दोषी कंपन्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीमुळे विषबाधा झाल्याने १९ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक शेतकऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर २५ शेतकऱ्यांना अंधत्व आले आहे. यवतमाळच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महत्त्वाची घोषणा केली. कीटकनाशक फवारणीत दोषी कंपन्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. याशिवाय १० हजार शेतकऱ्यांना प्रोटेक्शन मास्कचे वाटप केले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *