vitthal-pandharpur

पंढरपूरचा विकास ‘स्मार्ट तीर्थक्षेत्र’ म्हणून करणार

रोजगार

vitthal-pandharpur

अवघा महाराष्ट्र आणि जगभरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेले अध्यात्मिक पंढरपूर लवकरच जगाच्या नकाशावर सर्वोच्च ठरणार आहे. पंढरपूरचा विकास ‘स्मार्ट तीर्थक्षेत्र’ म्हणून करणार आहे. या साठी योग्य नियोजन आणि त्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे कॅनडाचे कौन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज यांनी स्पष्ट केले.
कॅनडाचे कॉन्सिल जनरल जॉर्डन रिव्हज, अँजेला शूवॉटर तारा यांनी पंढरपुराला भेट दिली.श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. मंदिराची पाहणी करून बांधकाम आणि इतर माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर चंद्रभागा नदी पात्र आणि मंदिर परिसराची पाहणी केली त्यानंतर संत तुकाराम भवन येथे कॅनडाच्या टीमने वारकरी, नागरिकांशी संवाद साधला.
दरवर्षी मोठय़ा संख्येने येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी कॅनडा सरकार पंढरपूरला स्मार्ट तीर्थक्षेत्र करू इच्छित आहे. यासाठी येथील नागरिक, लोकप्रतिनिधी, भाविक आणि सर्व संबंधितांशी चर्चा केली जाईल. स्मार्ट तीर्थक्षेत्र करण्यासाठी योग्य नियोजन आणि त्याचा आराखडा निश्चित केला जाईल, असे रिव्हज यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *