common-charges-involved-in-credit-card-machine-payment-processing-1030x687

नोटबंदीनंतर बँकांचं ३ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान

देश

common-charges-involved-in-credit-card-machine-payment-processing-1030x687

नोटाबंदीनंतर बँकांच्या पेमेंट यंत्रणेत करण्यात आलेल्या बदलांमुळे बँकांना तब्बल ३ हजार ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने एका अहवालात म्हटले आहे.बँकांकडून विकसित करण्यात आलेल्या पॉईंट ऑफ सेलला टेलिकॉम क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडून पूर्ण सहाय्य मिळायला हवे,असे एसबीआय समूहाच्या मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी म्हटले. पीओएस मशीनचा वापर डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वाईप करण्यासाठी केला जातो.
गेल्या वर्षीच्या जानेवारीत देशातील एकूण पीओएस मशिन्सची संख्या १३.८ लाख इतकी होती. यंदाच्या जुलै महिन्यात हा आकडा २८ लाखांवर पोहोचला. या काळात डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून होणारे व्यवहारदेखील काही प्रमाणत वाढले. मात्र टेलिकॉम क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांचा फटका बँकांना बसला. यामुळे बँकांना मोठे नुकसान सहन करावे लागले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *