247552-mumbaihadasa2

एल्फिन्स्टन-परळ रेल्वेस्टेशनला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी

मुंबई

247552-mumbaihadasa2

मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी झाली. माहितीनुसार, परळ भागात सकाळी जोरदार पाऊस पडला. लोकलमधून उतरलेले प्रवासी मोठ्या संख्येने पुलावर थांबले होते. गर्दीच्यावेळी मोठी अफवा पसरल्यानेप्रवाशांची धावपळ उडाळी. मोठी गर्दी जमल्याने ही चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० ते ३५ प्रवासी जखमी झाले आहेत.
परळ-एलफिन्स्टन येथील स्टेशनवरील पूल अत्यंत अरुंद आहेत. त्यामुळे थोडी जरी गर्दी झाली तरी चालणं अवघड होते. पावसामुळे सकाळच्यावेळी झालेली गर्दी आणि ही गर्दी वाढत गेल्याने पुलावर चेंगराचेंगरी झाली. गर्दीच्यावेळी मोठी अफवा पसरल्याने धावपळ उडाळी. त्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी अनेक जण पुलाचा आधार घेत मिळेल त्या मार्गाने लोक पुलावरुन खाली उतरण्याचा प्रयत्न करत होते. जीवाची परवा न करता जीव धोक्यात घालून लोक स्टेशन बाहेर पडत होते.
जखमींना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी हा पूल गर्दीनं खच्चून भरलेला असताना पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली आणि एकच घबराट पसरली. त्यातूनच ही चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *