Subhash-Deshmukh

दिवाळीआधी शेतकऱ्यांना कर्जमाफी – सहकारमंत्री सुभाष देशमुख

महाराष्ट्र

Subhash-Deshmukh

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कर्जमाफीसाठी दिलेली १ आॅक्टोबरची डेडलाईन हुकली आहे . कर्जमाफीसाठी बँकांकडून माहिती न आल्यामुळे कर्जमाफी १ आॅक्टोबरपासून देण्यात आली नाही असं कारण दिले आहे.
शेतकरी कर्जमाफीचा १ ऑक्टोबरचा वायदा चुकल्यानंतर राज्य सरकारनं कर्जमाफीसाठी आणखी एक डेडलाईन दिली आहे . आता दिवाळीआधी शेतकरी कर्जमाफी देणार असल्याचं सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी सांगितले आहे.
आतापर्यंत ५६ लाख ५९ हजार ३९३ शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये २ लाख ४१ हजार ६२८ शेतकऱ्यांनी आधार कार्डचा क्रमांक दिलेला नाही तसंच या अर्जांमध्ये ७७ .२६ लाख खातेदारांचा समावेश आहे.
एकीकडे कर्जमाफीची आकडेवारी सरकारने जाहीर केली पण बँकाकडून माहिती मिळाली नाही. असं कारण पुढे करण्यात आला. आता दिवाळीआधी कर्जमाफी दिली जाईल असा दावा करण्यात आला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *