dadar_091213073938

दादर फुलमार्केटमध्ये दसऱ्यासाठी फुलखरेदीला ग्राहकांची गर्दी

मुंबई

dadar_091213073938

एका दिवसावर येऊन ठेपलेल्या दसऱ्याने बाजारातही उत्साह निर्माण केला असून उत्सवाचा आनंद सुगंधित करण्यासाठी फूलबाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. दसऱ्याच्या दिवशी विशेष महत्त्व असलेल्या झेंडूच्या फुलांनी बाजार बहरला आहे.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मानल्या गेलेल्या विजयादशमीच्या सणात झेंडुच्या फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर येथील फूलबाजार झेंडूने व्यापून टाकले आहेत.झेंडूच्या दरांनी आतापासूनच शंभरी गाठली असून शनिवारी ते दीडशे रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शेवंतीच्या फुलांनी प्रति किलो २०० रुपयांचा भाव गाठला आहे.
झेंडूने आतापासूनच दराची शंभरी गाठली आहे. कलकत्ता झेंडू हा चार ते पाच दिवस टिकतो. त्यामुळे तोरणासाठी या झेंडूला जास्त मागणी असते. परंतु गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या फुलांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या बाजारात आलेल्या एकूण मालापैकी केवळ २० टक्के माल उत्तम दर्जाचा आहे. त्यामुळे या दर्जाची फुले सध्या १०० रुपये किलोने विकली जात आहेत. शुक्रवारी हे दर दीडशे रुपयांवर पोहोचतील, अशी शक्यता फूलविक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *