piyush-goyal_650x400_61452770685

रेल्वे टीसींना युनिफॉर्ममध्येच तिकीट चेक करण्याची सक्ती – रेल्वेमंत्री पियुष गोयल

देश

piyush-goyal_650x400_61452770685

तिकीट न काढणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपून त्यांना मोक्याच्या क्षणी गाठण्यासाठी टीसी साध्या वेशात येणं पसंत करत होते.मात्र यापुढे फक्त युनिफॉर्ममध्येच तिकीट चेक करण्याची मुभा टीसींना असेल.
सर्व आरपीएफ स्टाफ, तिकीट चेकर यांनी अधिकृत गणवेशातच चेकिंग करावं, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. राजधानी दिल्लीत आयोजित इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये ते बोलत होते.
गणवेशधारी टीसी दूरवरुनही ओळखता येतात, त्यामुळे तिकीट न काढणारे प्रवासी त्यांना चुकवू शकतात, असा दावा टीसींतर्फे केला जातो. मात्र गोयल यांनी युनिफॉर्मसक्तीचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *