priyanka-chopra-7592

‘फोर्ब्स’च्या यादीत प्रियंका चोप्रा आठव्या क्रमांकावर

मनोरंजन

priyanka-chopra-7592

फोर्ब्सच्या यंदाच्या सर्वाधिक कमाई करणा-या टिव्ही अभिनेत्रींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रालाही जागा दिली आहे. १ जून २०१६ ते १ जून २०१७ दरम्यान टिव्ही अभिनेत्रींनी कमवलेल्या उत्पन्नानुसार ही यादी जाहीर करण्यात आलीय.वार्षिक एक कोटी डॉलरच्या कमाईसोबत प्रियंका या यादीत आठव्या क्रमांकावर आली आहे. तिचे उत्पन्न ६५ कोटी रुपये आहे. तर ‘हाऊस ऑफ कार्ड्स’ची स्टार रॉबिन राईट ही ९० लाख डॉलरच्या कमाईसोबत नवव्या स्थानावर आली आहे.या यादीत सोफिया वरगारा ही पहिल्या क्रमांकावर आहे.तिची वार्षिक मिळकत २७१ कोटी रुपये इतकी आहे.
२०१६ मध्ये प्रियांकाने ११ मिलियन डॉलर इतकी कमाई केलेली. याशिवाय, ती काही उत्पादनांची ब्रॅण्ड अॅम्बेसेडरदेखील आहे. उत्पन्नात सातत्य राखणारी अभिनेत्री म्हणून ‘फोर्ब्स’ने या भारतीय अभिनेत्रीचा उल्लेख केला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *