bombay-high-court759

राज्यभरातील खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का – मुंबई हायकोर्ट

महाराष्ट्र

bombay-high-court759

राज्यभरात खड्ड्यांचं साम्राज्य असताना निष्क्रीय कारभार करणा-या राज्य सरकार ते ग्राम पंचायत अशा सगळ्यांवरच मुंबई हायकोर्टानं ताशेरे ओढले आहेत. राज्यभरातील रस्त्यांवर खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोकांचे जीव जात असताना खड्डे का बुजवले जात नाहीत, असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टाने विचारला आहे. इतकंच नाही तर खड्डे बुजवण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत का ? असा सवाल हायकोर्टाने विचारला आहे.राज्यभरातील पंचायत समित्या, नगर पंचायती, नगर परिषदा, नगर पालिका आणि महानगर पालिकांनी खड्डे का बुजवले नाहीत याचं उत्तर द्यावं असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ नोव्हेंबरला होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *