omcrS3gjhgcdc

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव मतदार यादीतून वगळले

देश

omcrS3gjhgcdc

माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यापुढील निवडणुकांमध्ये मतदान करु शकणार नाहीत. अनेक वर्षांपासून लखनऊला न आल्याने वाजपेयींचे नाव मतदार यादीतून हटवण्यात आले आहे. वाजपेयी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डमधून मतदानाचा हक्क बजावायचे. त्यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान केले होते. मात्र त्यानंतर प्रकृती अस्वाथ्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही.
अटल बिहारी वाजपेयी लखनऊ येथील बनारसी दास वॉर्डातून मतदान करत असत. देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे प्रमुख नेते म्हणून अटल बिहारी यांच्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असायचे. त्यांनी तब्बल १७ वर्षांपूर्वी (सन २०००) त्यांनी स्थानिक निवडणुकीत मतदान केले होते. झोनल अधिकारी अशोक कुमार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, अटल बिहारी वाजपेयी हे गेली अनेक वर्षे आपल्या पत्त्यावर राहात नाहीत. त्यामुळेच मतदारांची पडताळणी केल्यावर त्यांचे नाव मतदारयादीतून हटवण्यात आले. मतदारयादीतील पत्त्यानुसार वाजपेयी लखनऊमधील बासमंडी येथील घर क्रमांक ९२/९८-१ या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांचा मतदार क्रमांक १०५४ होता.
अटल बिहारी वाजपेयी यांनी २००० साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला होता. त्यावेळी ते पंतप्रधानपदी होते. यानंतर त्यांनी कधीही महापालिका निवडणुकीत मतदान केले नाही. २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी शेवटचे मतदान केले. प्रकृतीच्या तक्रारींमुळे वाजपेयी गेल्या अनेक वर्षांपासून लखनऊमध्ये आलेले नाहीत. सध्या ते ल्युटन्स झोनमधील ६-ए कृष्ण मेनन मार्गावर राहतात.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *