960x0

मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सच्या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी अ‍ॅपल कंपनीने वर्चस्व कायम

Uncategorized

960x0

मोस्ट व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सच्या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी अ‍ॅपल कंपनीने वर्चस्व कायम राखले आहे. व्हॅल्युएबल ब्रॅन्ड्सच्या यादीमध्ये अ‍ॅपलची किंमत ३% वाढून सुमारे १२ लाख करोड झाली आहे. या यादीत दुसर्‍या क्रमांकावर गूगल आणि तिसर्‍या क्रमांकावर मायक्रोसॉफ्टचा समावेश झाला आहे. टॉप टेन ब्रॅन्डपैकी टोयाटो आणि मर्सिडीज बेंज या कंपन्यांचे ब्रॅन्ड व्हॅल्यूदेखील ३.२७ आणि ३.११ लाख करोड़ आहेत. अमेझॉनने यंदा २९% ग्रोथ दाखवून पाचवे स्थान कमावले आहे. मीडिया, टेक्नोलॉजी आणि ऑटोमोटीव्ह पाहता नेटफ्लिक्स, सेल्फफोर्स आणि फरारी यांचा समावेश केला आहे. या तीन कंपन्यांपैकी नेटफ्लिक्सची ब्रॅन्ड व्हॅल्यू सर्वाधिक म्हणजे ३६,२३५ करोड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *