Glasgow : India's Pusarla Sindhu competes in the women singles final on day seven of the 2017 BWF World Championships at the Emirates Arena in Glasgow, Scotland, Sunday Aug. 27, 2017. AP/PTI(AP8_27_2017_000248B)

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूची पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस

क्रीडा

Glasgow : India's Pusarla Sindhu competes in the women singles final on day seven of the 2017 BWF World Championships at the Emirates Arena in Glasgow, Scotland, Sunday Aug. 27, 2017. AP/PTI(AP8_27_2017_000248B)

भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूची क्रीडा मंत्रालयानं पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस केलीय.पी.व्ही.सिंधूनं ऑलिम्पिकमध्ये २०१७ मध्ये रौप्य पदक पटकावलं होत.
देशातले दुसरे सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजे पद्म पुरस्कार. हे पुरस्कार मिळणे अत्यंत मानाचे समजले जाते. ऑलिंपिक फायनलपर्यंत पोचणारी सिंधू ही पहिली भारतीय ठरली आहे. कॅरोलिना मरिन विरुद्ध तिचा निसटता पराभव झाला होता. त्यानंतर जागतिक स्पर्धेतही रौप्य पदक तिने पटकावलं. तर नुकत्याच पार पडलेल्या कोरिया ओपन सुपर सीरिजचं अजिंक्यपदही सिंधूनं पटकावलं. बॅडमिंटनमधल्या तिच्या दमदार कामगिरीनंतर तिची या पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *