a

पुण्याचा अभिजीत कटके ‘भारत केसरी’ स्पर्धेमध्ये विजयी

क्रीडा

a

पुण्याचा तरुण पैलवान अभिजीत कटके कर्नाटकातल्या जामखंडीत भारत केसरी किताबाचा मानकरी ठरला आहे. अभिजीत कटकेनं कर्नाटकच्या शिवय्यावर १०-२ अशी मात करून ‘भारत केसरी’ हा मानाचा किताब पटकावला.अभिजीतने या स्पर्धेत पाच लढती लढल्या आणि या पाचही लढतींमध्ये अभिजीतने विजय मिळवलाय.अभिजीतने दिल्लीचा भीमसिंग (७-३), हरियाणाचा अनिल कुमार (७-५), हवाई दलाचा सतीश फडतरे (१०-०), आणि उत्तर प्रदेशचा अमित कुमार (८-४) यांना हरवले तर निर्णायक फेरीत त्याने “कर्नाटक केसरी” शिवय्याला १० -२ अशी करारी मात देत भारत केसरीची चांदीची गदा आणि ५१ हजार रुपये असा इनाम त्याला मिळाला.तसेच अभिजीत कटकेनं गेल्या वर्षी पदार्पणातच उपमहाराष्ट्र केसरी व उपहिंद केसरी किताबांचा मान मिळवला होता. २०१६ साली फ्रान्समध्ये झालेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *