Dhaka : India's Virat Kohli plays a shot,  during the Asia Cup Twenty20 international cricket match  between Bangladesh and India,  in Dhaka, Bangladesh, Wednesday, Feb. 24, 2016. AP/PTI(AP2_24_2016_000255B)

भारत श्रीलंका टी-२० सामना भारताचा ७ गडी राखून विजय

क्रीडा

Dhaka : India's Virat Kohli plays a shot,  during the Asia Cup Twenty20 international cricket match  between Bangladesh and India,  in Dhaka, Bangladesh, Wednesday, Feb. 24, 2016. AP/PTI(AP2_24_2016_000255B)

श्रीलंका दौऱ्याचा शेवटही टीम इंडियाने विजयानं केला. हा एकमेव टी-२० सामना भारतानं ७ गडी राखून जिंकला.पहिल्यांदा बॅटिंग करत श्रीलंकेने २० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावत १७० धावा केल्या. भारताकडून चहलनं ३ तर कुलदीप यादवनं २ विकेट घेतल्या. १७१ धावांचा पाठलाग करतांना, ४२ धावांवर भारतानं २ विकेट्स गमावल्या त्यानंतर विराट कोहलीनं कर्णधाराला साजेशी खेळी करत ५४ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकारांसह ८२ धावा फटकावल्या. तर मनिष पांडेनं ३६ चेंडूत चौकार आणि षटकारांसह ५१ धावांची खेळी केली. या उत्कृष्ट खेळीमुळे भारताने श्रीलंकेचा पराभव केला.
या मालिकेत ३ कसोटी,पाच वनडे आणि एक टी-२० असे एकूण ९ सामने भारताने जिंकले आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *