wp-image-482453508.jpg

१७ वर्षांनंतर विंडिजची इंग्लंडवर कसोटीत मात

क्रीडा

अनुभवी इंग्लंडवर हेडिंग्लेच्या मैदानात ५ गडी राखून मात करत वेस्ट इंडिजने कसोटी क्रिकेटमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे. १७ वर्षांनी इंग्लंडच्या मैदानावर वेस्ट इंडिजला कसोटी सामना जिंकता आला आहे. इंग्लंडने दिलेल्या ३२२ धावांचा पाठलाग करताना शाई होप आणि क्रेग ब्रेथवेटने अप्रतिम खेळी केली. शाई होपने नाबाद १२० धावांची शतकी खेळी केली, तर ब्रेथवेटने त्याला ९२ धावा काढत चांगली साथ दिली. सध्या ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने १-१ अशी बरोबरी साधलेली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *