wp-image-873964796.jpg

अभिनेते, दिग्दर्शक नीरज व्होरा दहा महींन्यापासून कोमामध्ये

मुंबई

प्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक नीरज व्होरा मागील दहा महिन्यांपासून कोमामध्ये आहेत. नीरज व्होरा यांना हृदयविकाराच्या धक्क्यानंतर ब्रेन स्ट्रोक आला. त्यानंतर गेल्या दहा महिन्यांपासून ते कोमात गेल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महीन्यांत त्यांना हार्ट अटॅक आला होता.

निर्माते फिरोझ नादियाडवाला यांच्या जुहूमधील बरकत व्हिलामध्ये व्होरा यांना ठेवण्यात आलं आहे. ११ मार्चपासून नादियाडवालांच्या घरातील एका रुमचं रुपांतर आयसीयूमध्ये करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे रुममधल्या भिंतींवर व्होरांच्या सिनेमांची पोस्टर्स आणि डीव्हीडीज लावण्यात आल्या आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *