p-vsindhu

विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूची चांगली लढत

क्रीडा

p-vsindhu

अंतिम फेरीत सिंधूपुढे जपानच्या नोझोमी आकुहाराचे आव्हान होते. या सामन्यात पहिला गेम सिंधूने गमावला असला तरी दुसरा गेम जिंकत तिने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या गेममध्ये सिंधू आणि ओकुहारा यांची २०-२० अशी बरोबरी झाली होती, पण त्यानंतर सिंधूने दोन गुण गमावले आणि तिच्या हातून जेतेपद निसटले.अंतिम सामन्याविषयी सिंधू म्हणाली की, ‘हा सामना रोमहर्षक होता. कारण प्रत्येक वेळी खेळात कुरघोडी सुरू होत्या. प्रत्येक गेम अटीतटीचा होता. आम्ही १४-१४, १८-१८, २०-२० असे प्रत्येक वेळी बरोबरीत होतो. कुठेही उसंत घेण्यासाठी वेळ नव्हता. आम्ही दोघींनीही पूर्णपणे व्यावसायिक खेळ केला. पण मी दुर्दैवी ठरले. पण भारतासाठी रौप्यपदक जिंकू शकले, या गोष्टीचा अभिमानही आहे.निश्चितच आम्ही दोघीही सुवर्णपदक पटकावण्यासाठी आतूर होतो. जेतेपद पटकावण्याच्या मी फार जवळ होते. पण अखेरच्या क्षणी सारे चित्र पालटले आणि मला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
विश्व अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने चांगली लढत दिली. पण अखेरच्या क्षणी आपल्या हातून सामना निसटला आणि जेतेपद पटकावता आले नाही, असे मत सिंधूने सामन्यानंतर व्यक्त केले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *