d

MIDC जमीन प्रकरण सुभाष देसाईंची राजीनामा घेऊन चौकशी करा : धनंजय मुंडे

राजकीय

d

MIDC जमीन प्रकरण सुभाष देसाईंची मंत्री पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊच शकत नाही, मंत्र्याचा राजीनामा घेऊनच न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मौजे गोंदेदुमाला आणि वाडिवरे ( इगतपुरी ) या MIDC जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांची एक सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.
ही समिती चौकशी करताना गेल्या १५ वर्षांतील MIDC ने जमीन गैर अधिसूचित करण्याबाबत निर्णय घेतला गेला आहे का, हे तपासणार आहे. शिवाय संबंधित प्रकरणामध्ये काही त्रुटी किंवा उणीवा आहेत का, हे तपासून निदर्शनास आणणार आहे. मात्र समिती स्थापन करताना चौकशीची कालमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीत मॅग्नेटिक महाराष्ट्रासाठी ६०० एकर जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र शिवसेनेच्या जवळच्या बिल्डरला फायदा मिळावा यासाठी यातली ४०० एकर जमीन देसाईंनी आरक्षित भूखंडातून वगळल्याचा आरोप विरोधकांनी सुभाष देसाईंवर केला आहे.

त्यामुळे उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली होती. त्यानंतर सुभाष देसाईंनी चौकशी होईपर्यंत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी राजीनामा स्वीकारला नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *