केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्तर प्रदेशातील कारखान्यांविरोधात काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. मात्र आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या संदर्भात कठोर कायदा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात दंडाची रक्कम १ लाख रुपयांवरुन ५ कोटी करण्यात यावी, असे नमूद करण्यात आले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबद्दलचा प्रस्ताव कायदे मंत्रालयाला पाठवला आहे. या प्रस्तावाला नीती आयोगाने संमती दिल्यामुळे लवकरच केंद्र सरकारकडून याबद्दलचा कायदा आणला जाऊ शकतो. एखाद्या कारखान्याकडून मोठ्या प्रमाणात परिसरात प्रदूषण झाल्यास त्यासाठी जबाबदार व्यक्तीला आजीवन तुरुंगवास आणि जास्तीत जास्त २० कोटींचा दंड ठोठावण्यात यावा, असेदेखील या प्रस्तावात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नमूद केले आहे.

पर्यावरण प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांविरोधात लवकरच कठोर नियम -केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ
Share on Social Media