Untitled-2

नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेस इंजिनसह ९ डबे घसरले

महाराष्ट्र

Untitled-2

वाशिंद- आसनगाव या दोन स्टेशन दरम्यान दुरांतोचे इंजिनसकट नऊ डबे रूळावरून घसरले.अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनसह नऊ डबे घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. एक्स्प्रेसचं इंजिन रुळावरुन घसरुन उलट पडलं, तर एक्स्प्रेसचे डबे वीस फूट अंतरावरील टेकडीवर जाऊन आदळले.
दरम्यान दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. सेवाग्राम एक्स्प्रेस मनमाडला उभी आहे तर पंचवटी एक्स्प्रेस इगतपुरी पासून परत पाठविण्यात येणार आहे . इतर लांब पल्ल्याच्या गाड्याही उशिराने धावत आहे. तर टिटवाळा ते कसारा दरम्यानची रेल्वे वाहतूक बंद झाली आहे

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *