rains-mumbai

मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत

मुंबई

rains-mumbai

सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे.  मुंबईमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून पावसाने झोडपून काढल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईत आज सुरू असलेला पाऊस  सर्वाधिक पाऊस असल्याचा अंदाज हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.मागील २४ तासांमध्ये मुंबईत १५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील दुपारच्या सत्रातील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *