Mumbai-Rains-1

मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना ‘२६ जुलै’ची आठवण

मुंबई

Mumbai-Rains-1

मुंबईत सध्या मुसळधार पाऊस पडतो आहे. सकाळपासूनच मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. पावसाने झोडपून काढल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर मार्गांची रेल्वे वाहतूकही ठप्प झाली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत उसंत घेतलेली नाही. या पावसामुळे मुंबईकरांना २००५ मध्ये पडलेल्या २६ जुलैच्या पावसाची आठवण झाली आहे. बस, टॅक्सी, रिक्षा यांचा आधार घेऊन घर गाठणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. शहरातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आल्याने त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.
मुंबईला यंदाच्या सर्वात मोठ्या पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. पावसाचा जोर आणखी वाढला आहे. येत्या काही तासात आणखी पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.
लोकल वाहतूक ठप्प आहे, बेस्टच्या बसेस सर्वच ठिकाणी पुरेशा नाहीत. त्यामुळे मुंबईकरांना रिक्षा आणि टॅक्सीचा पर्याय शोधावा लागत आहे. मात्र संधीचा फायदा घेत मुंबईतील रिक्षावाल्यांनी प्रवाशांची लूटमार सुरु केली आहे.
लोकल स्टेशनवर अडकलेले प्रवासी बाहेर येऊन टॅक्सी किंवा रिक्षाचा पर्याय शोधत आहेत. रिक्षावाल्यांकडून विविध कारणं देत काही मिनिटांच्या अंतरासाठी शंभर ते दोनशे रुपये प्रती व्यक्ती घेण्यात येत आहेत. त्यामुळे हा खर्च न परवडणाऱ्या प्रवाशांना नाईलाजाने बेस्ट बसचाच एकमेव पर्याय आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *