heavy-rain-in-mumbai

मुंबईत पावसाचा जोर वाढला

मुंबई

heavy-rain-in-mumbai

रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्ते, रेल्वे, हवाई अशी सर्व वाहतूक ठप्प झाली आहे.गेल्या २४ तासात मुंबईत १५२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पुढच्या काही तासात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलच्या तीनही मार्ग ठप्प झाले आहेत. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील ट्रॅकवर पाणी आलं आहे.मुंबईतील दादर, हिंदमाता, परळ, वरळी, जोगेश्वरी, अंधेरी, जेव्हीएलआर किंग सर्कल, वडाळा, कुर्ला बस डेपो जंक्शन, एलबीएस रोड, कुर्ला वेस्ट या भागात पाणी साचलं. तर अनेक भागात झाडं पडल्यामुळे रस्ते वाहतूक रखडली आहे.मुंबईत पावसाचा जोर इतका वाढलाय की जागोजागी पाणी साचलंय. मुंबईतल्या केईएम रूग्णालयातदेखील पाणी शिरलंय. त्यामुळे पावसाचा फटका आता रूग्णांनी देखील बसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *