konkan-rains

कोकणात येत्या ७२ तासांत अतिवृष्टीचा इशारा

कोकण

konkan-rains

गेले चार दिवस मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. येत्या ७२ तासात कोकणात अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आल्या आहेत. रायगड जिल्ह्यात ३ दिवसापासून पाऊस कोसळतोय. त्यामुळे सावित्री, कुंडलिका आणि आंबा या नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्हा आपत्कालीन कार्य कक्षाने पुढील ७२ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. रोह्याच्या कुंडलिका नदीनेही गेल्या ४ दिवसांत २ वेळा धोक्याची पातळी ओलांडली आहे. अलिबाग, पेण, महाड, माणगावं, पोलादपूर या तालुक्यांना पावसाने झोडपून काढलंय. ऐन सणासुदीच्या काळात बाप्पाच्या आगमनापासून पावसाने या आनंदाच्या उत्सवात सगळ्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. सोमवारी सकाळपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पेण परिसराला झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे भोगावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे पेण शहरालगत असलेल्या सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या पेण- खोपोली बायपास मार्गावरही पुराचे पाणी आले आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सकाळपासून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *