air-india_650x400_41468215921

एअर इंडियाच्या विमानात सापडला उंदीर.

देश

air-india_650x400_41468215921

एअर इंडियाच्या दिल्लीहून सॅनफ्रान्सिस्कोला जाणाऱ्या विमानात उंदीर सापडला. त्यामुळे उड्डाणाला ९ तास उशीर झाला. रविवारी मध्यरात्री २.३० वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाचे बोइंग ७७७ हे विमान सॅनफ्रान्सिस्कोला निघणार होते.परंतु,त्याचवेळी काही कर्मचाऱ्यांना विमानात उंदीर दिसला.त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने विमान धावपट्टीवरून माघारी घेण्यात आले व विमानात धूर सोडून उंदराला पळविण्यात आले. यासर्व प्रक्रारामुळे प्रवाशांना नऊ तास ताटकळत राहावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *