Road_traffic_in_Gwalior

मुंबई-गोवा हायवेवर असलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

कोकण

Road_traffic_in_Gwalior

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची लगबग सुरू आहे. मात्र मुंबई-गोवा हायवेवर असलेले खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मुंबईहून कोकणात जाताना वडखळ नाका हा महत्त्वाचा टप्पा असतो. वडखळ नाक्यावरूनच एक रस्ता अलिबागकडे जातो, तर दुसरा कोकणात. मात्र हा वडखळनाका ही कोकणात निघालेल्या प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरतोय.

महामार्ग चौपदरीकरणाचं रखडलेलं काम हे वाहतूक कोंडीचं मुख्य कारण आहे प्रवासी रस्त्याच्या बाजुला वाहनं पार्क करून चहासाठी किंवा किरकोळ खरेदीसाठी इथं थांबतात. खड्डे आहेतच. गटाराचं काम व्यवस्थित झालेलं नाही. डिव्हायडर नसल्यामुळे बेदरकार वाहन चालकांचं फावतं. यामुळे वडखळ नाका आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच होऊन बसलंय.प्रवासीच नव्हे, तर पोलीसही सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आलेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *