supreme-court_7f9c8246-c2c5-11e6-913d-826c0833a15d

व्यक्तिगत गोपनियता मूलभूत अधिकार आहे की नाही, याबाबतचा आज सुप्रीम कोर्ट निर्णय देणार

देश

supreme-court_7f9c8246-c2c5-11e6-913d-826c0833a15d

भारतातील १२२ कोटींहून अधिक लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्ट देणार आहे. व्यक्तिगत गोपनियता मूलभूत अधिकार आहे की नाही, याबाबतचा निर्णय आज (२४ ऑगस्ट) सुप्रीम कोर्ट देणार आहे. व्यक्तिगत गोपनियतेबाबतच्या याचिकेवर ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाची सुनावणी पूर्ण झाली आहे. याबाबतचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आज सुप्रीम कोर्ट निर्णय जाहीर करणार आहे.
यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. या याचिकांमध्ये आधार कार्डमुळे व्यक्तिगत गोपनियतेच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारी सर्वात महत्त्वाची मानली जाते आहे. ‘आधार’साठी बायोमेट्रिक पद्धतीने माहिती घेणे म्हणजे व्यक्तिगत गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता.

व्यक्तिगत गोपनियता हा मूलभूत अधिकार नसल्याचं सरकारने कोर्टात सांगितलं आहे. जर व्यक्तिगत गोपनियतेला मूलभूत अधिकाराचा दर्जा दिल्यास व्यवस्था चालवणं कठीण होऊन बसेल. शिवाय, कुणीही व्यक्तिगत गोपनियतेचं कारण देत फिंगर प्रिंट, फोटो किंवा अन्य माहिती देण्यास नकार देईल.

त्यामुळे व्यक्तिगत गोपनियता हा मूलभूत अधिकार आहे की नाही, याचा सर्वात आधी निर्णय घेण्याचं सुप्रीम कोर्टाने ठरवलं आहे. त्यानंतरच आधार कार्ड योजनेच्या वैधतेवर सुनावणी होईल.२०१२ साली आधार कार्ड योजनेत नागरिकांच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन झाल्याबाबत अनेक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. या सगळ्या याचिकांवर २ ऑगस्टला सुनावणी झाल्यावर सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. याचिकेवरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने ‘राइट टू प्रायव्हसी’चा निश्चित अर्थ लावण्यासाठी खंडपीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वातील ९ सदस्यीय खंडपीठ आज यावर हा निर्णय सुनावला आहे.
काय होते याचिकाकर्त्यांचे आक्षेप?
– ‘आधार’साठी जमवलेले लोकांचे वैयक्तिक तपशील खुले होऊ शकतात
– ‘आधार’ची सक्ती हा गोपनीयतेचा भंग
– आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आधार कार्डसाठी घेतलेली माहिती हॅक करणं अशक्य नाही
– आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आधारसाठी घेतलेले बोटांचे ठसे आणि फोटो कॉपी करणं अशक्य नाही
– लोकांच्या बायोमेट्रिक इन्फॉर्मेशनचा गैरवापर इतर कारणांसाठी होऊ शकतो

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *