indian-team-jersey4

भारत-श्रीलंकेमध्ये आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना

क्रीडा

indian-team-jersey4

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे.पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सहज विजय मिळवल्यावर श्रीलंकेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत आघाडी भ्ककम करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.भारताने कसोटी मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले होते. त्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय संघाने वरचष्मा कायम राखला होता. त्यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाला या दौऱ्यात आतापर्यंत सूर गवसलेला दिसलेला नाही. फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंना छाप पाडता आलेली नाही.कसोटी मालिकेनंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय खेळाडूकडून धडाकेबाज फलंदाजी पाहायला मिळाली आहे. यापुढेही त्याने कामगिरीत सातत्य राखावे, अशी आशा संघव्यवस्थापनाला असेल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *