subsidy

स्वस्त वीज खरेदी करण्यास राज्य वीज नियामक आयोगाचा बेस्टला हिरवा कंदील

मुंबई

subsidy

बेस्टच्या ग्राहकांना स्वस्त वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून टाटा कंपनीची वीज घेण्याऐवजी खुल्या निविदा पद्धतीने स्वस्त वीज खरेदी करण्यास राज्य वीज नियामक आयोगाने बेस्टला हिरवा कंदील दाखविला आहे.वर्षांनुवर्षे टाटा कंपनीकडून वीज घेत असलेल्या बेस्टने हे पाऊल उचलल्याने मुंबईतील अन्य वीज कंपन्यांमध्येही ग्राहकांची पळवापळवी व स्वस्त वीजदर देण्याची तीव्र स्पर्धा सुरू होण्याची चिन्हे आहेत. बेस्टला टाटा वीज कंपनीपेक्षा प्रति युनिट केवळ २४ पैसे स्वस्त वीज देण्याचा प्रस्ताव महावितरण कंपनीने दिला होता. मात्र आयोगाने तो मान्य न केल्याने अतिरिक्त वीजेचे काय करायचे, हा प्रश्न महावितरण कंपनीपुढे आहे.बेस्टने ७५० मेगावॅट इतकी वीज निविदा पद्धतीने घेण्याच्या दिलेल्या प्रस्तावास आयोगाने मान्यता दिली आहे. मात्र वीज पारेषण यंत्रणेच्या मर्यादा लक्षात घेता एप्रिल २०१८ मध्ये ५०० मेगावॅट इतकीच वीज मुंबईबाहेरून बेस्टला आणता येईल. त्यामुळे बेस्टने ३०० मेगावॅट वीज २४ तासांसाठी, २०० मेगावॅट सकाळी सात ते रात्री १२ आणि २५० मेगावॉट वीज सकाळी नऊ ते रात्री सात या वेळेत उपलब्ध होण्यासाठी त्रिस्तरीय निविदा मागवाव्यात, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *