supreme-court_7f9c8246-c2c5-11e6-913d-826c0833a15d

‘तीन तलाक’वर आजपासून बंदी; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

देश

supreme-court_7f9c8246-c2c5-11e6-913d-826c0833a15d

संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या तिहेरी तलाकप्रकरणी आज सुप्रीम कोर्टाने अंतिम निकाल सुनावला. ‘तिहेरी तलाक कुठल्याही संविधानिक कलमांचे उल्लंघन करत नाही. तो पर्सनल लॉचा भाग असल्याने न्यायिक हस्तक्षेपाने त्यात काहीही बदल करता येणार नाही’ असं जस्टीस खेहार यांचे म्हणणं होतं. पण त्याच वेळी सहा महिने बंदी मात्र कोर्टाने लागू करावी असं त्यांचं म्हणणं होतं. या सहा महिन्यात केंद्र सरकारने संसदेत कायदा पारित करावा असंही ते म्हणाले. सरकार हस्तक्षेप करून संसदेत कायदा पारित करून तिहेरी तलाकवर निर्णय घेऊ शकतं अशी भूमिका खेहार यांनी मांडली. न्या. अब्दुल नाझीर यांचंही बंदी आणता येणार नाही असं म्हणणं होतं. पण उरलेल्या तीन न्यायाधीशांनी तिहेरी तलाक असंविधानिक ठरवला आहे. न्या. कुरिअन जोसेफ यांनी तिहेरी तलाकला कुठलीही कायदेशीर मान्यता देता येणार नाही असं म्हटलं.
आजपासून संसदेत कायदा तयार होईपर्यंत तिहेरी तलाकवर बंदी असेल. मात्र कायदा होण्यास विलंब लागला तरीही तिहेरी तलाकवरील बंदी कायम असेल.
सरन्यायाधीशांसह ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाने आज आपला निर्णय दिला. मात्र तिहेरी तलाकवरुन ५ पैकी ३ न्यायाधीश हे तिहेरी तलाकविरोधात तर २ न्यायाधीश हे तलाकच्या बाजूने होते.

त्यामुळे आता  तिहेरी तलाक इतिहासजमा झाला असून हा एक मोठा विजय म्हणता येईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *