RTO

प्रवाशांच्या तक्रार निवारणासाठी परिवहन विभागाचा अँप

महाराष्ट्र

RTO

प्रवासा दरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत मागण्यासाठी तसेच वाहतुकीसंदर्भातील तक्रार करणे वाहतुकीला सोयीस्कर व्हावे या परिवहन विभागातर्फे मोबाईल अँप उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशी आता एका क्लीकवर आपल्या समस्या परिवहन विभागाकडे नोंदवू शकतात. RTO Mah arashtra या नावाने हे अँप उपलब्ध आहे. तक्रारी नोंदवण्यासाठी या अँपचा वापर करावा असे आवाहन परिवहन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले आहे.
सार्वजनिक सेवा वाहनातून प्रवास करताना प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.अशा वेळेस तक्रार करण्यासाठी योग्य व्यासपीठ त्यांना तत्काळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने परिवहन विभागातर्फे RTO Maharashtra हे अँप तयार केले आहे. हे अँप डाउनलोड करून नागरिक सहजरित्या त्यांच्या समस्या व तक्रारी नोंदवू शकणार आहेत.या अँपच्या माध्यमातून नागरिकांना रिक्षा ,टॅक्सी व इतर कोणत्याही वाहनांविरुद्ध सहजरित्या तक्रार करता येणार आहे. गुगल प्ले स्टोअर वरून RTO Maharashtra या नावाने अँप डाउनलोड करून घ्यावे, हे येथे मोफत उपलब्ध होईल.www.trasport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेब आधारित प्रणालीद्वारे तक्रार करण्यासाठी (complanit ) या शीर्षकाखाली लिंक देण्यात आली असून जनतेने या सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ.प्रवीण गेडाम यांनी केले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *