main-qimg-81d52e7d53b5cb311393767187b4f282-c

राज्यभरात बैलपोळ्याचा सण उत्साहात

महाराष्ट्र

main-qimg-81d52e7d53b5cb311393767187b4f282-c

आज राज्यभरात बैलपोळ्याचा उत्साह आहे. आपल्या लाडक्या सर्जा- राजाला सजवण्यास, सुरुवात झाली आहे.बैल शेतकऱ्यांचा खरा सोबती असतो. वर्षभर तो शेतकऱ्यांसोबत राबत असतो. याच बैलाचा हा सण साजरा करण्याची परंपरा ग्रामीण भागात आहे.बैल हे सामर्थ्याचे ,शक्तीचे प्रतीक आहे. बैलांनी भारताच्या राष्ट्रीय चिन्हातही स्थान मिळवलं आहे.बैल पोळ्यानिमित्त ज्यांच्या घरी बैल नाहीत ते मातीपासून बनवलेल्या बैलाची मनोभावे पूजा करतात. शेतकरी बैलांना सजावट करतात. दुपारी पूजा, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. गावातून संध्याकाळी मिरवणूकही काढली जाते.
पाऊस न पडल्याने शेतकरी राजा सण कसा साजरा करायचा या विवंचनेत होता. पण गेले २ दिवस मुसळधार पडलेल्या पावसाने शेतकऱ्याच्या जीवात जीव आला आहे. आता पिकं जगतील त्यामुळे सर्जाराजाच्या कौतुकाचा आजचा दिवस बळीराजा उत्साहात साजरा करू शकतोय. तसंच भुसावळमध्येही बैलाचा साज खरेदी करण्यासाठी बाजारात बळीराजाने गर्दी केली होती.बैल पोळ्यासाठी बाजारात खरेदीचा उत्साह वाढला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *