sonam

माथाडी भवन उभारून त्यात अण्णासाहेबांचा पुतळा उभारा ! नगरसेविका सोनम जामसुतकर यांची मागणी

मुंबई

sonam

मुंबई महापालिकेने माथाडी भवन बांधण्याचे जाहीर केले तरी त्यासाठी यावर्षी कोणत्याही आर्थिक तरतूद केली नाही. मस्जिद बंदर येथे भव्य माथाडी भवन उभारून त्यात माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जावा. त्यासाठी दोन कोटींची तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी महापालिका अर्थसंकल्पावर बोलताना केली.
मुंबई महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प हा संशयांकित,प्रश्नांकित आणि मुंबईकरांची दिशाभूल करणारा तसेच फसवणूक करणारा आहे,असे सांगून जामसुतकर यांनी अर्थसंकल्पावर कोरडे ओढले. ताडवाडी येथे महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या बीआयटी चाळींचापुनर्विकास करताना स्थानिकांचे पुनर्वसन माझगाव ताडवाडी याचठिकाणी अथवा एक ते दोन किलोमीटर परिसरातील महापालिकेच्या जागेवर संक्रमण शिबीर बांधून करावे. अशी मागणीही त्यांनी केली. या संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना नगरसेवक निधीतून मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यात याव्यात आणि हा खर्च संबंधित विकासकाकडून वसूल करण्यात यावा. अशी सूचनाही त्यांनी मांडली. हँकॉक ब्रीजचे काम हे दोन यंत्रणांच्या समन्वयाअभावामुळे रखडले आहे. या प्रकरणात महापालिकेने लक्ष घालून तातडीने हा पूल बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. जेष्ठ नागरिकांच्या धोरणांसाठी एक लाख रुपयांची तरतूद केलेली आहे. यावरून जेष्ठ नागरिकांबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचे उघड होते, असाही आरोप त्यांनी केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *