16_03_2017-bjp-flag

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपचं निर्विवाद वर्चस्व, ६१ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी

मुंबई

16_03_2017-bjp-flag

मिरा-भाईंदर महापालिकेची निवडणूक सर्व पक्षांनी स्वबळावर लढली होती. निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने ही चर्चा फोल ठरवत एक हाती बहुमत मिळवलं.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने एकहाती सत्ता राखली आहे. ९५ जागांपैकी भाजपने ६१ जागा जिंकल्या आहे.तर शिवसेनेला २२ जागांवर विजय मिळाला आहे.दुसरीकडे काँग्रेसचे १० उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसेल खातंही उघडता आलेलं नाही. याशिवाय अपक्षांनी दोन जागा पटकावल्या आहेत.

मिरा भाईंदर पालिकेचा अंतिम निकाल

भाजप – ६१ जागा

शिवसेना – २२ जागा

काँग्रेस – १० जागा

राष्ट्रवादी काँग्रेस – ००

मनसे – ००

बहुजन विकास आघाडी – ००

अपक्ष/इतर – ०२ जागा

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *