race

नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसाची दमदार हजेरी

महाराष्ट्र

race

पावसाळा अर्धा उरकला तरी विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं पुनरागमन केलं नव्हतं.पण आता नागपूरसह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांत पावसानं हजेरी लावलीय. गेल्या २४ तासात नागपुरात १४१.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रात्रभर बरसलेल्या पावसामुळं हावेत थोडाफार गारवा निर्माण झाला आहे. तर विदर्भातल्या अमरावती, वर्धा, भंडारा, यवतमाळ, गोंदिया, अकोलामध्ये पावसानं चांगली हजेरी लावलीय.
दुसरीकडे, बुलडाणा जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पाऊस झाला असला तरी बळीराजा मुसळधार पावसाच्या प्रतिक्षेत आहे. जेणेकरुन शेतीची कामं, आणि पिकं उभी राहण्यासाठी मदत होईल.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *