Note

आरबीआयकडून ५० रुपयांची नवी नोट चलनात

देश

Note

Note-50-New

देशातल्या लोकांना दोनशे आणि हजार रुपयांच्या नव्या नोटेची प्रतीक्षा असतानाच आता आरबीआयने ५० रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची घोषणा केली आहे. आरबीआयकडून पन्नास रुपयांच्या नोटेचा फोटो जाहीर करण्यात आलाय.नोटबंदीनंतर आरबीआयने ५०० आणि २ हजारांची नवी नोट बाजारात आणली होती. त्यानंतर आता ५० रुपयांची नोटही चलनात आणलीय. अर्थात ५० रुपयांची नवी नोट आली असली तरी जुनी नोट लगेच रद्द होणार नाही. पन्नास रुपयांच्या नोटेचा रंग हिरवा असून त्यावर देवनागरीत पन्नासचा आकडा लिहण्यात आलाय.नोटेच्या मागच्या बाजूला रथासोबत हम्पीच्या मंदिराचं चित्र असेल. नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील.नोटबंदीनंतर आरबीआयकडून टप्प्या टप्प्याने नव्या नोटा बाजारात आणल्या जाताहेत. त्याचाच भाग म्हणून ही ५० रुपयांची नवी नोट बाजारात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *