Mumbai-rain-one5

मुंबई मध्ये पावसाचा जोर, मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिट उशिरा

मुंबई

Mumbai-rain-one5

मुंबई पूर्व उपनगरांत पावसाचा जोर वाढला असून, भांडूप आणि कांजुर मार्गदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिट उशिराने होत आहे.मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर भागात मुसळधार पाऊस पडतोय . पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, लोकलची वाहतूक उशिराने होत असल्याने कामानिमित्त मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.
काल मध्यरात्रीपासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या दोन्ही मार्गावरील वाहतूक १५ ते २० मिनिट उशाराने सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *