395878-tawde6

कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही , शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही !

महाराष्ट्र

395878-tawde6

मुंबई विद्यापीठाचे निकाल आता लवकरच लागतील. पण त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षावर परिणाम होणार नाही अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. मुंबई विद्यापीठाच्या निकालातील घोळासंदर्भात राज्यपाल विद्यासागर राव यांच्याबरोबर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बैठक पार पडली. विद्यापीठांच्या रखडलेल्या निकालांचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी ही बैठक बोलवली होती. राज्यपालांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, प्रभारी कुलगुरू, प्रधान सचिव यांची बैठक घेतली. त्यासंदर्भात एक प्रेझेंटेशन झालं. कॅटच्या परीक्षेमार्फत जे प्रवेश दिले जातात ते कॅट मेरीटमार्फत दिले जातील आणि निकाल उशिरा सबमिट केला तरी चालेल अशी हमी तावडे यांनी दिली.
उत्तरपत्रिका तपासण्याबाबत उद्भवलेल्या अडचणींसंदर्भात आणि या अडचणींचे कोणत्या पद्धतीने निराकारण करण्यात आले,याची माहिती राज्यपालांना देण्यात आली असून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *