bail

बैलगाडी शर्यतीला नियमावलीचे वेसण,बैलगाडी हौसींच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा

कोकण

bail

राज्य सरकारने बैलगाडी शर्यत सुरु करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्यामुळे राज्यभरात बैलगाडीप्रेमींच्या उत्साहाला उधाण आले होते. पावसाळा संपताच सर्जा- राजाची जोडी पुन्हा शर्यतीसाठी सज्ज करण्यासाठी शर्यत प्रेमी तयारीला लागले होते. अनेक मोर्चे, आंदोलने करून बैलगाडी शर्यत सुरु झाली असल्याचे शेतकऱ्याने गृहीत धरले होते. मात्र उच्चन्यायालयाच्या निर्णयाने शर्यतप्रेमींचा हिरमोड झाला आहे. बैलगाडी बंदी मुळे शेतकऱ्यांच्या हौशीबरोबर रोजगारनिर्मितीही बंद झाली आहे. सुरवातीला बैलगाडी शर्यतीचे विधायक झाल्या नंतर शर्यत सुरु होईल म्हणून शेतकऱ्यांना प्रतीक्षा,राष्ट्रपतींची विधायकावर सही होईल म्हणून प्रतीक्षा आणि आता सरकारी नियमावली उच्चन्यायालयात सादर करायची म्हणून प्रतीक्षा. शेतकऱ्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच असल्याचे दिसून आले आहे. २५ जुलै रोजी राष्ट्रपतींनी विधायकावर स्वाक्षरी करून बैलगाडी शर्यतीचा मार्ग मोकळा केला होता. मात्र बुधवारी उच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीला परवानगी देण्यास मनाई केली आहे. राज्य सरकारने बैलगाडी शर्यत सुरु करण्याबाबत अधिसूचना काढली असली तरी जोपर्यंत बैलगाडी स्पर्धा दरम्यान बैलांना ईजा होणार नाही याविषयी सरकार नियमावली बनवित नाही तोपर्यंत बैलगाडी शर्यतीला परवानगी देणार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *