IMG-20170812-WA0015

एल.एस.पी. एम वरिष्ठ महाविद्यालय चोंढी, येथे राबविले स्वच्छता अभियान

कोकण

IMG-20170812-WA0015

l m

लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे वरिष्ठ महाविद्यालय चोंढी- किहीम येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट स्वच्छता पंधरवडा कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छते विषयी समाजात जनजागृती करण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांतर्फे करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत स्वच्छता विषयाप्रमाणे पोस्टर, स्लोगन,निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसर व आंतरवर्ग स्वच्छता या मध्ये उस्फुर्तपणे भाग घेतला. वर्ग स्वच्छता व शैक्षणिक सादरीकरण केले. तसेच १२ ऑगस्ट रोजी स्वयंसेवकांतर्फे किहीम बीच वर स्वच्छता करण्यात आली.
दिनांक ८ ऑगस्ट रोजी एल.एस.पी. एम वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एल. मिश्रा यांनी रा.से.यो. स्वयंसेवकांना स्वच्छतेचे महत्व तसेच हागणदारी मुक्त गाव करणे गरजेचे आहे याचे महत्व मार्गदर्शनातून सांगितले. स्वच्छता पंधरवडानिमित्त रा.से.यो. स्वयंसेवकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्रीय समन्वयक रा.से.यो. विभाग मुंबई विद्यापीठ डॉ. एस. डी. तुपारे ह्यांचे उद्बोधन लाभले. रा.से.यो. स्वयंसेवक हा जागृत असला पाहिजे तेव्हाच तो समाजात जनजागृती करू शकेल. स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना व त्याचा उद्देश समजवून सांगितला. तसेच स्वच्छता अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.
स्वच्छता अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवण्यासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एल. मिश्रा यांनी विशेष मार्गदर्शन केले. हा उपक्रम राबवण्यासाठी रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रध्दा पाटील ,व प्रा. विनायक साळुंके तसेच स्वयंसेवक प्रतिनिधी कुणाल कवळे, पूजा शेडगे, भूपेंद्र विचारे, अतिश फुटके, प्रथमेश पाटील, प्रथमेश वाकडे, रुतिका पाटील, संचित राणे इ. विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *