ad

रायगड जिल्हा हागणदारी मुक्त करूया, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांचे आवाहन

कोकण

ad

रायगड जिह्यातील १५ तालुक्यांपैकी १२ तालुके १००% हागणदारी मुक्त झाले आहेत. उर्वरित तीन तालुके ९० ते ९८ % टक्क्यांपर्यंत आहेत. जिल्हातील सर्व घटकातील मंडळींनी एकत्र येऊन संपूर्ण जिल्हा शंभर टक्के हागणदारी मुक्त करूया. असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे यांनी बुधवारी केले.
ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद स्वछ भारत मिशन यांच्या मार्फत आयोजित आत्मसन्मान कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
आदिती तटकरे म्हणाल्या , स्वच्छतेची आवड हि शाळेस्तरापासूनच सुरु केली पाहिजे. माझी शाळा स्वच्छ शाळा या अभियानामार्फत शाळेपासूनच विध्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले पाहिजे. शाळांमध्ये चांगल्या पद्धतीचे वातावरण निर्माण करून शैक्षणिक अभ्यासाबरोबर स्वच्छतेचे ज्ञानदेखील विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची गरज आहे.
रायगड जिल्हातील १२ तालुके १००% हागणदारी मुक्त झाले आहेत. उर्वरित ३ तालुके लवकरच हागणदारी मुक्त करून रायगड जिल्ह्याला पहिल्या क्रमांकाचा मान मिळवून देण्यास सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *