sonam

हँकॉक ब्रिजची पुनर्बांधणी लवकर करा, नगर सेविका मनोज जामसुतकर यांची मागणी

मुंबई

sonam

माझगांव व डोंगरीला जोडणाऱ्या हँकॉक ब्रिज पाडून वर्षभराचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही नवा ब्रिज बांधून झाला नाही. महापालिका आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच स्थानिक, विध्यार्थी,जेष्ठ नागरिक यांना त्रास सहन करावा लागत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन महा पालिका प्रशासनाने हँकॉक ब्रिजच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी प्रभाग क्र. २१० च्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी अर्थसंकल्पीय अंदाजावरील भाषणात केली आहे.
माझगाव ताडवाडी येथील महानगरपालिकेच्या मालकी हक्क असलेल्या बीआयटी चाळींच्या पुनर्विकासात स्थानिक भाडेकरूंना त्याच ठिकाणी किंवा जवळच्या परिसरातील संक्रमण शिबिरात राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी जामसुतकर यांनी केली आहे. संक्रमण शिबिरात राहणाऱ्यांना मुलभूत सुविधा पुरवण्या करीता स्थानिक नगरसेवकांना त्यांचा निधी वापरण्याची मुभा द्यावी. आणि झालेला खर्च संबंधित विकासका कडून वसूल करण्यात यावा, असेही जामसुतकर यांनी अर्थसंकल्पीय अंदाजावरील भाषणात नमूद केले आहे. महापालिका प्रशासनाने २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात जेष्ठ नागरिकांसाठी करण्यात आलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी ५० लाखांची तरतूद केली होती. याबाबतची तरतूद पूर्णपणे वापरली गेली नाही किंवा याचे उत्तरही आयुक्तांनी आपल्या निवेदनात दिले नाही, याकडे जामसुतकर यांनी लक्ष वेधले. या वरून महापालिका प्रशासन जेष्ठ नागरिक धोरणांची अंमलबजावणी करण्यास उदासीन असल्याचे दिसून येते, असे म्हणत त्यांनी आपला जाहीर निषेध केला. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पामध्ये माथाडी भवन बांधण्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली होती; परंतु प्रत्यक्षात माथाडी भवन बांधण्याचे काम कोठेही सुरु करण्यात आले नाही. एवढ्यावरच महापालिका प्रशासन न थांबता २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात माथाडी भवन बांधण्यासाठी केवळ २५ लाखांची तरतूद केली आहे. यावरून महापलिक प्रशासन माथाडीच्या भावनासाठी उदासीन असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै . आ. अण्णासाहेब पाटील यांनी मस्जिद बंदर मध्ये माथाडी कामगाराची चळवळ सुरु केली. त्या मस्जिद बंदर मध्ये कै . आ. अण्णासाहेब पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी जामसुतकर यांनी केली. यासाठी २०१७-१८ अर्थसंकल्पात २ कोटींची ठोस तरतूद करण्यात येऊन अंमलबजावणी करावी. असेही जामसुतकर यांनी अर्थसंकल्पीय अंदाजावरील भाषणात नमूद केले

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *