maratha-kranti-morcha-satara-8

मराठा क्रांती मोर्चाची जय्यत तयारी

महाराष्ट्र

maratha-kranti-morcha-satara-8

आरक्षणासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी ९ ऑगस्टला मुंबईमध्ये मूक मोर्चाची हाक दिली आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता भायखळा येथील जिजामाता उद्यानापासून सुरु होणारा हा मोर्चा सीएसटी (आझाद मैदान )येथे संपेल. आज पर्यंत झालेल्या सर्व मोर्चाच्या तुलनेत मुंबईतील मराठा समाजाचा महामोर्चा नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज एकवटला जाईल. असा विश्वासही आयोजन समितीने व्यक्त केला आहे.या मोर्चासाठी राज्यभरातून जवळपास २५ लाख नागरिक सहभागी होणार असल्याचा दावा मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नानासाहेब कुटे-पाटील यांनी सोमवारी केला.
हा मोर्चा भायखळा येथील वीर जिजामाता उद्यान येथून सुरु होणार असून कै. अण्णासाहेब पाटील पूल,खडा पारसी, इस्माईल मर्चंट चौकाहुन तसाच तो जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसएमटी मार्गे आझाद मैदानावर पोहचणार आहे.
दरम्यान या मोर्चात सहभागी होण्यासाठी पुणे मार्गे खाजगी वाहनाने येणाऱ्या समाज बांधवांच्या मदतीसाठी चेंबूर येथे स्वयंसेवक तैनात करण्यात येणार आहेत या मोर्चासाठी संपूर्ण मुंबईत ६ हजार स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यांना आयडी कार्ड आणि टी – शर्ट देण्यात येणार आहेत. तसेच हे स्वयंसेवक खाजगी वाहनांना चेंबूर येथील भक्ति पार्कमार्गे इस्टर्न फ्री मार्गाने थेट वडाळा आरटीओ ऑफिसच्या जवळ असलेल्या बीपीटीच्या जमिनीवर गाडी पार्किंग साठी मदत करतील
या शांतता मोर्चा मध्ये महिला अग्रभागी असणार आहेत. त्यानंतर समाजातील युवा मंडळी, पाठिंबा देणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थाचाही सहभाग असेल. या मोर्चातील आर्थिक भार स्वयंस्फूर्तीने उचलण्यात आला आहे. यासाठी कोणताही निधी,देणगी घेण्यात आलेला नाही. जेवण,पाणी यांची व्यवस्था, समन्वय व शांतता ठेवण्याच्या जबादारीचेही वाटप करून देण्यात आले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *