ram-kadam-s-dahi-handi-celebration_1377848228160

दहीहंडी उत्सवावरील निर्बंध हटले,वयोमर्यादेची अट १८ वरून १४ वर

मुंबई

ram-kadam-s-dahi-handi-celebration_1377848228160

दहीहंडी उत्सवावरील सर्व निर्बंध मुंबई हायकोर्टाने हटवले असून, १४ वर्षाखालील मुलांच्या सहभागावर मात्र बंदी घालण्यात आली आहे. थरांच्या उंचीसंदर्भातील अधिकार राज्य सरकारला आहे. या बाबतचा निर्णय सरकारने घ्यावा, अशा सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. हायकोर्टाच्या या निर्णयाने गोविंदा पथक आणि आयोजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दहीहंडीबरोबर थरांची उंची वाढत चालल्याने गोविंदांच्या अपघातांची संख्याही दरवर्षी वाढत आहे. या आशयाची याचिका कोर्टात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
गोविंदांना हेल्मेट , सेफ्टी बेल्ट , चेस्ट गार्ड देणे तसेच सगळ्यांच्या नावाची नोंद ठेवण्याचे आदेश आयोजकांनी दिले आहेत. या शिवाय दहीहंडीच्या ठिकाणी मोबाइल, टॉयलेट्स बंधनकारक असून दारूपिणाऱ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी मनाई केली आहे. आयोजकांना ध्वनी प्रदूषणासंदर्भात सर्व नियम लागू आहेत. अशी माहिती राज्य सरकारने हायकोर्टाला दिली.
दहीहंडीत १४ वर्षाखालील मुले सहभागी होणार नाही, याची काळजी घेऊ अशी ग्वाही राज्य सरकारने हायकोर्टात दिली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *