shri

श्री सदस्यांनी श्रमदानातून चौल – रेवदंडा मुख्य रस्ता खड्डेमुक्त केला

कोकण

shri

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाण रेवदंडाच्या श्री सदस्यांनी रविवारी दि. ६ ऑगस्ट सकाळी सात ते दुपारी दोन वाजे पर्यंत केलेल्या श्रमदानातून रेवदंडा – चौल मुख्य रस्ता खड्डे मुक्त केला. खडी आणि ग्रीट टाकून त्यावर रोलर फिरवून हे खड्डे बुजवण्यात आले. रेवदंडा पारनाका येथून खड्डे भरण्याची मोहीम सुरु केली. श्री सदस्यांनी हातात फावडे,घमेल घेऊन रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी घाम गाळला. रेवदंडा -चौल मुख्य रस्त्यावरील रेवदंडा पुलानजीक वाहनांना डोईजड होत असलेला भला मोठा खड्डाही अतोनात परिश्रम घेऊन श्री सदस्यांनी भरून काढला. हा भला मोठा खड्डा भरून काढण्यासाठी दोन ते तीन तास परिश्रम घ्यावे लागले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *