su

येत्या पंधरा दिवसात रेशन दुकानदारांचे प्रश्न सोडवणार , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांचे दुकानदारांना आश्वासन

कोकण

su

रायगड जिल्हातील इंदापूर या मध्यवर्ती ठिकाणी रायगड जिल्हातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचा भव्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना तटकरे यांनी रास्त भाव धान्य दुकानदारांना सोबत घेतल्या शिवाय कोणत्याही योजना राबवता येणार नाहीत असे त्यांनी म्हटले आहे. सरकारला अभिप्रेत काम करताना ज्या माध्यमातून आपण काम करीत आहोत तिची काळजी घेतली गेली पाहिजे म्हणूनच या व्यवस्थेत बदल करताना त्यांच्या हातून चुकीचे काम होऊ नये. याची खबरदारी केवळ वेगवेगळी बंधने लादून होणार नाहीत. बंधने लागू करीत असताना त्यांचे कमिशन व रास्त मागण्या या बाबत न्याय कसा मिळेल, बदल करताना त्यामध्ये रास्त भाव धान्य दुकानदार भरडू नये अशी भूमिका आपण घेऊ असे स्पष्ट प्रतिपादन यावेळी आमदार सुनील तटकरे यांनी केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *