A2It8fGB

मराठा बांधवानो ९ ऑगस्टच्या मोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा

महाराष्ट्र

A2It8fGB

मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी ९ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात मराठा समाज बांधवानी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. मराठा समाजातील तरुणांना आरक्षण मिळण्यासाठी या मोर्चाचे आयोजन केले आहे. आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुण-तरुणींना शिक्षण, नोकरी यात प्राधान्य मिळाले पाहिजे या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा असल्याने समाज बांधवानी मोठया संख्येने सहभागी होऊन आपले ऐक्य दाखवून द्यावे असेही राणे म्हणाले.
मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईतील भायखळा राणीच्या बागेत एकत्र येऊन आझाद मैदानाकडे मोर्चा नेणार आहेत. अनेक मराठा बांधव आपापल्या वाहनाने मुंबईत येतील. भायखळ्याला जवळ असलेल्या बीपीटी गाडी अड्डा येथे हजारो वाहनांची पार्किंग व्यवस्था मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांच्या वतीने करण्यात आली आहे. इस्टर्न, वेस्टर्न आणि हार्बर मार्ग येथून जिजामाता उद्यानाला कसे पोहोचाल याबाबत मराठा क्रांती मोर्चा आणि पोलिसांनी तयारी केली आहे.

कोल्हापूर सांगली येथून येणारी वाहन एपीएमसी मसाला मार्केट वाशी येथे थांबवता येतील. सातारा येथून येणाऱ्या गाडया एपीएमसी कांदा बटाटा मार्केट वाशी येथे लावता येतील त्याच बरोबर पुणे जिल्हयातील ज्या वाहनांना मुंबई शहरात गाडी न्यायाची नाही अशा वाहनांची सोया आम्ही करू असे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. वाशी स्टेशन अथवा सानपाडा स्टेशन येथून हार्बर ट्रेन मार्गे रे रोडला जाता येईल. रे रोड येथून जिजामाता उद्यान जवळ आहे. रे रोड जवळील बीपीटी येथील ट्रक टर्मिनलमध्ये अंदाजे २५ हजार गाडया पार्क करण्याची सोय उपलब्ध आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *