n

नारळी पौर्णिमा, नारळ फोडीचा रंगतदार खेळ

कोकण

n

नारळीपौर्णिमेला दर्याला नारळ अर्पण करून जस त्याला शांत केलं जात व इतर विविध कार्यक्रमही केले जातात. त्याच प्रमाणे नारळी पौर्णिमेचे एक आकर्षण म्हणून हा खेळ खेळाला जातो.नारळाच्या झाडाचा जसा अनेक प्रकारे उपयोग केला जातो तसेच त्याचे फळ असलेल्या नारळांपासूनही विविध प्रकारचे पदार्थ तयार करून त्या नारळातील खोबर स्वयंपाकात वापरता येतो. मग अशा अमाप येणाऱ्या नारळाचा तत्कालीन परिस्थितीत तरुणाईने नारळी पौर्णिमेनिमित्त छंद जोपासला तो नारळ फोडा- फोडीचा दोघे जण नारळ फोडा -फोडी करत असताना त्यातील एकाचा नारळ फुटतो तो फोडणाऱ्याला मिळतो. म्हणूनच म्हटले जाते “नारळावरील नारळ आपटा फुटेल त्याचा तोटा”. कोकणातील किनारपट्टीत पारंपरिकरित्या नारळीपौर्णिमेनिमित्त होणाऱ्या नारळ फोडा- फोडीची सुरुवात कशी झाली कोणी केली या बद्दल कोणत्याही प्रकारची माहिती लिखित अथवा तोंडी स्वरूपात उपलब्ध होत नाही. कॊकणात नारळाच पीक मोठया प्रमाणात येत असल्याने कोणीतरी सहजरित्या खेळाला सुरुवात केल्याने त्याची त्यावेळी लोकांना या वेगळ्या प्रकारच्या खेळाची आवड निर्माण झाली त्यातूनच या खेळाचा प्रचार आणि प्रसार मोठया प्रमाणात झाला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *